सप्तश्रृंगी गडावरील ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ची अंतिम चाचणी

दिगंबर पाटोळे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सदर प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून ट्रालीच्या अंतिम चाचणीसाठी गेल्या पास सहा दिवसांपासून युक्रेन येथील कंपनीचे सल्लागार तंत्रज्ञ प्रकल्पाची तपासणी करुन ट्रॉलीची चाचणी घेत असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी सांगितले. सुरु असलेल्या अंतिम चाचणीस परदेशी तंत्रज्ञांनी हिरवा कंदील दर्शविल्यास कंपनीचा पुढील प्रशासकीय तपासणी व मान्यतेचा मार्ग मोकळा होणार असून येत्या एक ते दोन महिन्यात ट्रॉली भाविकांची सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. 

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील बहुचर्चीत व देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ ची अंतिम चाचणीस परदेशी तंत्रज्ञाच्या उपस्थित सुरु असून लवकरच ट्रॉली भाविकांच्या सेवेसाठी दाखल होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अद्याप प्रशासकीय तपासण्या व परवानग्या बाकी असताना फ्युनिक्युलर ट्रॉलीतून मानवी वाहतूक करीत असल्याच्या तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तहसिलदारांनी केली असून याबाबत  कंपनी विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कार्यकारी अभियंत्यानी दिला आहे.

सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह  गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यांमधून दररोज येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन अधिक सुखकर व्हावे तसेच वृद्ध, अपंग, आजारी, गरोदर महिला, लहान मुले यांनाही देवीच्या मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून दर्शन घेता यावे. यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीचा पर्याय समोर येवून राज्यशासना मार्फत खाजगीकरणातून फ्युनिक्युलर ट्रॉलीचा साकारण्यात येत आहे. मे. सुयोग गुरुबक्षाणी़ रोपवेज प्रा. लि. नागपूर या कंपनी फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

सदर प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून ट्रालीच्या अंतिम चाचणीसाठी गेल्या पास सहा दिवसांपासून युक्रेन येथील कंपनीचे सल्लागार तंत्रज्ञ प्रकल्पाची तपासणी करुन ट्रॉलीची चाचणी घेत असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी सांगितले. सुरु असलेल्या अंतिम चाचणीस परदेशी तंत्रज्ञांनी हिरवा कंदील दर्शविल्यास कंपनीचा पुढील प्रशासकीय तपासणी व मान्यतेचा मार्ग मोकळा होणार असून येत्या एक ते दोन महिन्यात ट्रॉली भाविकांची सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान सदर प्रकल्पाचे काम करणारी सुयोग गुरुबक्षानी कंपनी ट्रालीतून नवरात्र उत्साहात मर्जीतील अधिकारी, लोकप्रतिनिधी व खाजगी व्यक्तींची वाहातूक करीत आहे. याबाबत सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, तहसिलदार व काही लोकप्रतिनिधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदरचे काम अपूर्ण असतांनाही  फ्युनिक्युलर ट्रॉलीतून मानवी वाहातूक करीत असल्याच्या वांरवार तक्रारी केल्या आहेत. याबाबत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पाचे लोकार्पन झाले नसतांना त्यातून मानवी वाहातूक करणे ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे नमुद करुन तात्काळ मानवी वाहतूक बंद करण्यात यावी असा लेखी आदेश कार्यकारी अभियंत्यानी देवून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Web Title: Nashik news Funicular Trolly in wani