कचरा विलगीकरण मोहिमेचा फज्जा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नाशिक - ऑगस्टअखेपर्यंत शंभर टक्के कचरा विलगीकरण केले जाईल, असा गाजावाजा केला जात आहे. पण आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत आतापर्यंत अवघ्या ८४ हजार कुटुंबांमध्येच कचरा विलगीकरणाचे महत्त्व पोचविण्यात विभागाला यश आल्याचे एका पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कचरा विलगीकरण मोहिमेचा फज्जा उडण्याची शक्‍यता आहे.

राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरांमधूनच कचरा विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महापालिकांना तशा सूचना देण्यात आल्या. नाशिक महापालिकेने स्वच्छतेत वरच्या क्रमांकावर येण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कचरा विलगीकरण करण्याचा विडा उचलण्यात आला. त्यासाठी ऑगस्टअखेरपर्यंतची मुदत निश्‍चित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात घंटागाडीमध्ये विलगीकरणाची सोय करावी, त्यानंतर नागरिकांनी ओला व सुका कचरा विलगीकरण करून घंटागाडीत टाकावा, असे नियोजन आहे. ऑगस्टनंतर कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवरच दंडात्मक आकारणी केली जाणार आहे. पण आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत कचरा विलगीकरणाचे मोठे वास्तव समोर आले आहे.

शहरातील दोन लाख ८८ हजार कुटुंबांपैकी फक्त ८४ हजार ४३४ कुटुंबांकडूनच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीत टाकला जात आहे. विशेष म्हणजे आठ प्रभागांची माहिती आरोग्य विभागाकडे नाही. त्यात ११, १४, २६, २८, २९, ३०, ३१ या प्रभागांचा समावेश आहे.

Web Title: nashik news garbage