स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांचा ‘बीवायके’त राडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नाशिक - गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेले वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) बंद करण्याचा निर्णय गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके वाणिज्य महाविद्यालयाने घेतला होता. मात्र, या निर्णयामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घालत आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने माघार घेतली. त्यानंतर आता १२ जानेवारीला स्नेहसंमेलन होईल.

विद्यार्थी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सचिवपदाच्या निवडणुकीवरून विद्यार्थ्यांच्या एका गटात खदखद निर्माण झाली होती. जीएस निवडप्रक्रियेत महाविद्यालय प्रशासनातर्फे हस्तक्षेप करण्यात आल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांकडून व्यक्‍त होत होती. त्यातच महाविद्यालय प्रशासनाने यंदा वार्षिक स्नेहसंमेलन न घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. विद्यार्थी मोठ्या संख्येने काळे टी-शर्ट घालून आज महाविद्यालयात हजर झाले. ‘भेदभाव नको’ या आशयाचे वाक्‍य लिहिलेला कागद विद्यार्थ्यांनी आपल्या टी-शर्टवर चिटकवले होते. महाविद्यालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन छेडताना विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. काही विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकवत हक्‍काची मागणी केली. प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घालताना स्नेहसंमेलन भरविण्याची मागणी केली. अखेर निर्णय माघारी घेत स्नेहसंमेलन संयोजनाला हिरवा कंदील देण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने सभोवतालच्या विविध महाविद्यालयांत आंदोलन हा चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: nashik news gathering in byk college