राणे, विखेंपाठोपाठ पतंगरावांचीही भाजपवर जडली माया 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नाशिक - माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राधाकृष्ण विखे यांच्याशिवाय पतंगराव कदम हेही भाजपच्या कामकाजावर प्रसन्न आहेत. सत्तेत असताना त्यांच्या काळातही न झालेली कामे मार्गी लागल्याने भाजपवर माया असल्याचा चिमटा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढला. 

नाशिक - माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राधाकृष्ण विखे यांच्याशिवाय पतंगराव कदम हेही भाजपच्या कामकाजावर प्रसन्न आहेत. सत्तेत असताना त्यांच्या काळातही न झालेली कामे मार्गी लागल्याने भाजपवर माया असल्याचा चिमटा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढला. 

भारतीय जनता पक्षात येण्यास कॉंग्रेसचे अनेक नेते इच्छुक असल्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, की कॉंग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. भाजपच्या कामकाजावर खूश असल्यामुळेच हे घडते आहे. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी जलसंपदा विभागाच्या कामकाजाबद्दल उघड स्तुती करीत त्याचा प्रत्यय दिला आहे. सत्तेत असताना त्यांचे जे जलप्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत, अशा प्रकल्पांना मान्यता मिळाल्याने कदम भाजपच्या कामावर प्रसन्न आहेत. श्री. राणे आणि विखे साहेब मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी मला फार माहिती नाही. पण पतंगराव कदम यांनी माझ्याजवळच आमच्या 

कामाची तारीफ केली आहे. सांगली येथील कार्यक्रमात त्यांनी खुल्या दिलाने आमच्या कामाचे कौतुक केले. जलसिंचन क्षेत्रातील कामाबद्दल ज्या वेळी एवढे दिग्गज नेते बोलतात, यावरून तुम्ही समजू घ्या, असा टोला त्यांनी लगावला. 

भावलीबाबत कानावर हात 
भावली धरणातून शहापूरला पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत श्री. महाजन यांनी कानावर हात ठेवले. पिण्यासाठी पाणी ही प्राथमिकता आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या पार्श्‍वभूमीवर भावली धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेतला असावा पण भावलीबाबत असा काही निर्णय झाला की काय हे मात्र माहिती नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: nashik news girish mahajan politics bjp