दक्षिण गंगेत जेटीवरून होणार बोटींची सहा कि.मी. ये-जा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नाशिक - शहराची वाढती वाहतूक, प्रदूषणरहित, वेगवान प्रवासासाठी जलवाहतूक हा भक्कम पर्याय आहे. नाशिकला समुद्रकिनारा नसला तरी गोदावरी पात्रातून जलवाहतूक सुरू होऊ शकते, यावर कोणाचा विश्‍वास बसणार नाही. परंतु, ते प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. 

स्मार्टसिटीतील ‘प्रोजेक्‍ट गोदा’ अंतर्गत अहिल्यादेवी होळकर पूल ते नवश्‍या गणपती मंदिर अशी सुमारे सहा किलोमीटरची जलवाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी दोन जेटी केंद्रांची निर्मिती होणार असून, त्यासाठी एक कोटी ८० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. स्मार्टसिटीत ५१ प्रकल्पांचा समावेश आहे. स्मार्टसिटी अंतर्गत ‘प्रोजेक्‍ट गोदा’साठी ५१२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सोमेश्‍वरपासून नांदूरपर्यंत नदीच्या दोन्ही तीरांचा विकास केला जाईल. गोदातीरांचे सौंदर्यीकरण करताना शहराचे धार्मिक महत्त्व जपले जाणार आहे. गोदाघाटाचे पौराणिक सौंदर्य साकारण्यासाटी दगडी भिंत, पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत.

‘प्रोजेक्‍ट गोदा’मध्ये...
वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन
अरुणा व वाघाडी नद्यांसाठी वळण घाट
हनुमान घाट ते रामवाडी पुलाची निर्मिती
चिंचबन ते हनुमानवाडीदरम्यान पादचारी पूल
नदीकिनारी वृक्षारोपण, सायकल ट्रॅक
वाघाडी नदीकिनारी सायकल ट्रॅक
सुंदरनारायण मंदिर घाटांची बांधणी
अहिल्यादेवी होळकर पुलाखाली यांत्रिक दरवाजा
कुसुमाग्रज काव्य उद्यानापर्यंत डीपी रोड

Web Title: nashik news Godavari River Ganga