मलनिस्सारण केंद्राचे पाणी थेट गोदावरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान महापालिकेने गोदावरी नदीत गटारीचे एक थेंब पाणीसुद्धा जात नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले. प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. पंचवटी, अमरधाम येथील वाघाडी नाल्याजवळील मलनिस्सारण केंद्रांचे चेंबर फुटल्याने पाच दिवसांपासून नदीत पाणी मिसळत असल्याने महापालिकेचा प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेला दावा फोल ठरला आहे.

नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न होत आहेत. त्यामध्ये मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढवून पाण्यातील ऑक्‍सिजनची मात्रा वाढवणे, गोदावरीत मिसळणारे सांडपाण्याचे नाले बंद करणे, वाहने व कपडे धुणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रदूषणाला आळा घालणे, गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करणे आदी उपायांचा यात समावेश आहे. त्यासाठी दर वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. जनहित याचिकेनुसार प्रतिज्ञापत्रावर गटारीचे पाणी मिसळत नसल्याचे लिहून दिले आहे. असे असताना प्रत्यक्षात गोदावरी संवर्धनावर काम होत नसल्याचे दिसून येत आहे. याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांना पंचवटी, अमरधाम येथील वाघाडी नाल्याजवळ चेंबर फुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविले. त्यांना फक्त आश्‍वासन देण्यात आले. पाच दिवसांपासून गोदावरीत सांडपाणी वाहत आहे.

Web Title: nashik news godawari water pollution Sewage water