गुगलच्या ‘तेज’ ॲपमधील त्रुटीवर योगेशचा रामबाण उपाय!

संतोष विंचू 
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

ऑनलाइन सेवेतील दर्जेदार गुगलने हे ॲप सुरू केल्याने त्याचा वापर नक्कीच अधिक होणार आहे. त्यामुळे त्यातील त्रुटी अनेकांना अडचणीच्या ठरणार होत्या. त्रुटी निदर्शनाला आणून देताच गुगलने तातडीने दुरुस्ती केली. तांत्रिकदृष्ट्या आपल्याला काहीतरी समजते ते समाजाच्या उपयोगाला यावे म्हणूनच मी हा शोध घेतला.
- योगेश तंटक, येवला

येवला - संघर्ष, संयम आणि उत्तमतेचा ध्यास असला की आपली हुशारी आपण सहतेने समाजाच्या हितासाठी उपयोगात आणू शकतो. हेच पुन्हा एकदा येथील युवक योगेश तंटक याने दाखवून दिले आहे. ‘पेटीएम’ला टक्कर देण्यासाठी गुगलने गेल्या आठवड्यात ऑनलाइन पेमेंटसाठी तेज नावाचे ॲप सुरू केले. पण पहिल्याच दिवशी या ॲपमध्ये असलेली सुरक्षेची त्रुटी योगेशने शोधून काढत गुगलच्या निदर्शनास आणून दिली. गुगलनेही काही तासांतच ही दुरुस्ती करून वापरकर्त्यांचे होणारे नुकसान टाळले आहे. या कामगिरीमुळे योगेशला आता गुगलच्या हॉल ऑफ फेमच्या यादीत स्थान मिळाले आहे.

शून्यातून विश्‍व निर्माण करून यशालाही आपल्यापुढे झुकायला लावणाऱ्या योगेशच्या वाटचालीचा प्रवास तसा थक्क करणारा आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या योगेशने येथील एसएनडी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात संघर्ष करतच इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पदवीनंतर त्याने आपल्या हुशारीची चुणूक अनेकदा दाखवून दिली. डिजिटल प्रणालीमध्ये अनेक व्यवहार हे ‘पेटीएम’सारख्या ॲपच्या माध्यमातून होत आहेत. ग्राहकही तितक्‍याच विश्‍वासाने या सगळ्या पर्यायांचा वापर करताना दिसत आहेत. म्हणूनच डिजिटल आर्थिक व्यवहारांचे वाढते विश्‍व लक्षात घेऊन गुगलने तेच ॲप सुरू केले आहे. ‘गुगल तेज ॲप’ याद्वारे बॅंक खात्यातून पैशांची देवाणघेवाण तसेच विविध स्वरूपाची खरेदी व बिले पे करण्याचे काम करणे शक्‍य आहे. या ॲपच्या प्रसिद्धीसाठी गुगलने एक रेफरल योजना सुरू केली असून, एकाने दुसऱ्याला या ॲपची लिंक पाठवली व त्याने ती इन्स्टॉल केल्यास दोन्ही ग्राहकांना 

काय आहे तेज ॲप? 
गुगलने भारतात १८ सप्टेंबरला ऑनलाइन पेमेंटसाठी तेज नावाचे ॲप सुरू केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. या ॲपच्या मदतीने वापरकर्त्यांना पैसे पाठविणे, बॅंकेच्या खात्यात रक्कम भरणे, विविध देयकांची पूर्तता करणे इत्यादी कामे करता येणार आहेत. शिवाय बॅंक खात्याला जोडणेही शक्‍य होणार आहे. यामुळे पेटीएम आणि मोबिक्विक या ॲपना मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. तेजच्या मदतीने बॅंकेच्या खात्यातून पेमेंट करण्याची तसेच रक्कम भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी गुगलतर्फे कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही.

Web Title: nashik news google tej app yogesh tantak Yeola