सरकारने मार्चएंड अनुषंगाने उडवलाय निर्णयांचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक - आर्थिक वर्षअखेरीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच सरकारकडून निर्णयांचा धडाका उडवून देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर मंगळवारी (ता. 27) एकाच दिवसात 84 आदेश जारी झाले.

नियोजन, जलसंधारण, नगरविकास, गृह, ग्रामविकास, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, कौशल्य विकास, अन्न-नागरी पुरवठा, कृषी-पशुसंवर्धन विभागाचा प्रत्येकी एक आदेश संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. याशिवाय सर्वाधिक 13 आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे; तर त्याखालोखाल 12 आदेश शालेय व क्रीडा विभागाचे आहेत. सहकार-पणनचे 2, वित्तचे 5 अन्‌ महसूल व वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, सामान्य प्रशासन विभागाचे प्रत्येकी दहा आदेश जारी झाले आहेत.

Web Title: nashik news government decission