लोककलावंतांच्या संमेलनासाठी सरकारकडून मदत - महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नाशिक - लोककलावंतांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करणार आहोत. दिवाळीनंतर नाशिकमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय लोककलावंत संमेलनाला संपूर्ण सहकार्य करू, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. शासकीय विश्रामगृहावर लोककलावंतांची बैठक झाली. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, शाहीर दत्ता वाघ, मेघराज बाफना, राधाबाई नाशिककर आदी उपस्थित होते.

बैठकीत लोककलावंतांसाठी घरकुल योजनेची मागणी करण्यात आली. लोककलावंताना मिळणारे मानधन दीड हजार रुपयांवरून पाच हजार रुपये करावे, एसटी व रेल्वेभाड्यात सवलत द्यावी, शासकीय कार्यक्रमात लोककलावंतांना स्थान द्यावे, तमाशा आणि इतर सुविधांसाठी दिल्या जाणाऱ्या पॅकेजमध्ये वाढ करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title: nashik news Government help from the gathering of folk artists