'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ला कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नाशिक - कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रबोधन कार्याला गतिमान करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी एकत्र येऊन "कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कारा'ची सुरवात केली. या वर्षीचा हा तिसरा पुरस्कार प्रा. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ला जाहीर झाला असल्याची माहिती पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ. मिलिंद कसबे व पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष डॉ. नितीश सावंत यांनी कळविले आहे. गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम सुरू आहे.

धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आणि मानवतावादी समाज उभा करण्याचे स्वप्न डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांनी पाहिले होते. लाखो कार्यकर्त्यांच्या साथीने अंनिसने मोठे प्रागतिक काम केले आहे.

Web Title: nashik news govind pansare award declare