आरोग्य विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

32 केंद्रे, 45 जागा; 9 हजारांवर मतदार
नाशिक - येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळासाठी उद्या (ता. 28) सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत राज्यातील 32 केंद्रांवर मतदान होईल. 45 जागांसाठी ही निवडणूक होत असून, 9134 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

मतदान होत असलेल्या जागा पुढीलप्रमाणे (कंसात मतदारांची संख्या) - अभ्यास मंडळ - 36 (एकूण 909 - वैद्यकीय प्री-क्‍लिनिकल- 94, दंत क्‍लिनिकल मेडिकल- 161, आयुर्वेद व युनानी प्री-क्‍लिनिकल- 153, पॅरा-क्‍लिनिकल-142, क्‍लिनिकल काया- 182, शल्य- 177). अधिसभा - 4 (एकूण 1885 - प्राध्यापक गटातून मुंबई विभाग- 563, पुणे- 609, नाशिक- 372, औरंगाबाद- 341). दरम्यान, अधिसभेच्या नागपूर आणि अमरावती विभागातून निवडणूक बिनविरोध झाली आहे. प्राध्यापक वगळून

शिक्षक गट - 4 (एकूण 9, 341 - वैद्यकीय- 4,134, दंत-1,696, आयुर्वेद व युनानी- 1,933, तत्सम-1,371). विद्या परिषद - 1 (तत्सम अंतर्गत- 51). मतमोजणी 30 डिसेंबरला विद्यापीठाच्या मुख्यालयात होणार आहे.

Web Title: nashik news health university election