इगतपुरीत 24 तासांत 145 मिमी पाऊस; धरणांच्या साठ्यात वाढ

विजय पगारे
शनिवार, 15 जुलै 2017

इगतपुरी तालुक्यातील अती पाऊसाच्या भागात सलग चौफेर तुफानी मारा करीत दुसऱ्या टप्यात पाऊसाने सर्वत्र जोरदार मुसंडी मारली असुन घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतारना पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय स्थिती आजही कायम राहीली आहे.

इगतपुरी : इगतपुरी शहरासह व कसाराघाट व पाश्चिम घाट माथ्याच्या परिसरासह तालुक्यात गेल्या तीन -चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेसह  झालेल्या मुसळधार पावसामुळे घोटी शहरासह व ग्रामीण भागासह पश्चिम जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या चोवीस तासात पुंन्हा धुव्वाधार अशी 145 मिमी पावसाची  विक्रमी नोंद झाली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे पाउसाने इगतपुरी तालुक्यात पावसाच्या सरासरीने दिड हजाराचा टप्पा पार केला आहे या चार दिवसांच्या दमदार पाउसाने धरणसाठ्यांमध्ये ही भरीव वाढ झाल्याने यंदा धरणांच्या साठयात विक्रमी अशी वाढ झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील अती पाऊसाच्या भागात सलग चौफेर तुफानी मारा करीत दुसऱ्या टप्यात पाऊसाने सर्वत्र जोरदार मुसंडी मारली असुन  घाटमाथ्यावरील इगतपुरी,भावली, मानवेढे,काळूस्ते,वैतारना पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय स्थिती आजही कायम राहीली आहे.

आजही विक्रमी बरसात :- दरम्यान इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी अशी 145 मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर आजपर्यंत तालुक्यात 1हजार 629 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यावरून पावसाने आपल्या पारंपारिक सरासरीकडे वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान सरासरीने हजारीचा टप्पा पार केल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान तालुक्यातील भावली धरण परिसरात सर्वाधिक 127 मिमी पाऊस इगतपुरी परिसरात 145 मिमी घोटी परिसरात 68 तर दारना धरण परिसरात 114 मिमी असा विक्रमी पाऊस आज झाला आहे.

दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग
तालुक्यात सर्वत्र धुवाधार पाउस झाल्यान दारणा धरणातुन 9 हजार 790  तर नांदुरमध्यमेश्वर धरणातून  आज पर्यत 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे .

धरणाच्या पातळीत विक्रमी  वाढ
इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणांनी उन्हाळयात शंभर टक्के तळ गाठला होता मात्र गेल्या चार  दिवसांपासून सर्वत्र मुसळधारेसह संततधार कोसळत असलेलेया पावसामुळे धरनामध्ये कमालीची वाढ़ झाली आहे दारना व भावली धरणात अनुक्रमे 75 व 66 टक्के वाढ झाली आहे आज (ता 15) अखेर चोवीस तासात दारना धरणात 1 हजार 728  द ल घ फु तर भावली धरणात 958 द ल घ फु पाणी संचित झाले आहे त्यामुळे ही दोन्हीधरणे अर्ध्यापेक्षा वर भरले आहेत सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे आज अखेर दारणा धरण 75%,भावली, 65% ,कडवा 31 % मुकणे,14% ,तर वालदेवी 32%, गंगापुर 62%,कश्यपी 37%,गौतमी गोदावरी 25%,पालखेड 24, नांदुरमध्यमेश्वर 93 % भरल्याने समाधान व्यक्त करव्यात येत आहे

इगतपुरी तालुक्यातील सहा मंडळामधील आजचा पाउस असा :-
(मिलीमिटर मध्ये  ):- धारगाव-67,टोकद-88,वाडीवऱ्हे-79, नादंगाव बु -49,घोटी- 67 इगतपुरी 145

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Nashik news heavy rainfall in Igatpuri

टॅग्स