तहसीलदार, सरपंचांच्या प्रयत्नांनी  पारधवाडी तलावातील काढला गाळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

इगतपुरी - शेणवड बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील पारधवाडी आदिवासी वस्तीत पाझर तलावातील गाळ काढून पाण्याचे स्रोत मोकळे करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांच्या संकल्पनेतून आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून गाळ काढला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त पाऊल उचलले, म्हणून सरपंच कैलास कडू यांनी गौरवोद्‌गार काढले. 

तीन वर्षांपासून पाझर तलावात मोठा गाळ साचला होता. यामुळे पाण्याचे स्रोत बंद झाले होते. जयराम खडके, ग्रामपंचायत सदस्य काळू दिवटे, ग्रामसेवक बी. आर. गावडे, कुंडलिक गिळंदे, सोसायटीचे अध्यक्ष सोनू खडके, मच्छिंद्र कडू, रतन कडू, अशोक शिद, मानाजी शिद, रामा शिद, आनंदा खडके, भरत कडू, उल्हास कडू, अनंता कडू, बबन खडके, काशीनाथ खडके, बाळा गव्हाणे, मच्छिंद्र गायकर, भरत सोनवणे, श्‍याम भागवत व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: nashik news igatpuri social work