इगतपुरी तालुक्याची आमसभा वादळी होण्याचे संकेत

गोपाळ शिंदे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मागील वर्षी पंचायत समिती आवारात घेण्यात आलेल्या आमसभा नागरिकांनी  चांगलीच गाजवत अधिकाऱ्यासह विविध खात्यांवर रोष व्यक्त केला होता.

घोटी :  आमदार निर्मलाताई गावित यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आमसभेत मागील वर्षीच्या आमसभेतील रेंगाळलेले प्रश्न,व पुढील वर्षाच्या कामकाजाची आखणी करण्यापूर्वी आमसभा अत्यंत महत्वाची असल्याने इगतपुरी तालुक्याची गेल्या सात महिन्यापासून चर्चेत असलेली आमसभेचे तारीख निश्चित झाल्याने नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी सुटकेचा निश्वास टाकला.

आमसभा ही वर्षातून एकदाच घेण्यात येत असते या सभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्याचा व त्याचे उत्तर मिळवण्याचे आणि प्रश्न सोडवण्याची संधी या सभेच्या माध्यमातून मिळते म्हणून नागरिक मोठ्या संख्येने येणार असल्याने प्रशासनाने आमसभेची जय्यत तयारी सुरु केली आहे.याकरिता घोटी येथे संभाजी नगर शेजारील मोकळ्या ग्राउंडवर मंडप टाकण्यात आला आहे,सकाळी अकरा वाजता आमसभेस सुरवात होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी दिली. 

मागील वर्षी पंचायत समिती आवारात घेण्यात आलेल्या आमसभा नागरिकांनी  चांगलीच गाजवत अधिकाऱ्यासह विविध खात्यांवर रोष व्यक्त केला होता. खंडित वीज पुरवठा, पाणीपुरवठा योजनेतील भ्रस्टाचार ,आरोग्या विभागाची झालेली वाताहत,रस्ते,अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची  मनमानी याच बरोबर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्‍त्या, अपंग तिन टक्के निधी,रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणावर चर्चा अत्यंत वादळी झाली होती,यामुळे  याही वर्षी होणारी आमसभा वादळी होण्याचे संकेत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nashik news igatpuri taluka general meeting