इंद्रपाल साहनींच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नाशिक - औद्योगिक विकास महामंडळातील फाइल गहाळप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात असलेले उद्योजक इंद्रपाल साहनी यांच्या उच्च न्यायालयातील जामीन अर्जावर मंगळवारी (ता. 7) सुनावणी होणार आहे. 

18 ऑक्‍टोबरपासून हृदयरोगाच्या कारणास्तव साहनी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर सोमवारी (ता. 30) त्यांची पुन्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. 

औद्योगिक विकास महामंडळातील फाइल गहाळप्रकरणी उद्योजक इंद्रपाल सहानी मध्यवर्ती कारागृहात आहेत. गेल्याच आठवड्यात जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. साहनी यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. नाशिक पोलिसांनी आक्षेप नोंदविला. जिल्हा न्यायालयात जामीन अर्जावर निकाल लागण्यापूर्वी साहनी यांनी उच्च न्यायालयात अर्ज केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने अर्ज बाद करून नवीन प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. साहनी यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे. त्यावर मंगळवारी (ता. 7) सुनावणी होणार आहे.

Web Title: nashik news indrapal sahani