डाळिंब, पेरू फळपिकांसाठी  हवामान आधारित विमा योजना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नाशिक - प्रतिकूल हवामान घटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील डाळिंब व पेरू या फळपिकांचा समावेश आहे. त्यासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै आहे.

नाशिक - प्रतिकूल हवामान घटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील डाळिंब व पेरू या फळपिकांचा समावेश आहे. त्यासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै आहे.

नाशिक जिल्ह्यातील डाळिंब व पेरू फळपिकांसाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. डाळिंबासाठी प्रतिहेक्‍टर एक लाख १० हजार रुपये एकूण विमा संरक्षित रक्कम असून, हप्ता ५५०० रुपये आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०१७ आहे. जास्त पाऊस, फळपक्वता ते काढणी अवस्थेसाठी कमाल नुकसानभरपाई मर्यादा ६० हजार प्रतिहेक्‍टर असून, विमा संरक्षण कालावधी १६ ऑक्‍टोबर ते ३० डिसेंबर २०१७ आहे. विमा संरक्षण कालावधी १५ जुलै ते ३० डिसेंबर २०१७ पर्यंत असून, पावसाचे कमी- अधिक प्रमाण, फळवाढीची अवस्था व फळपक्वतेच्या टप्प्यातील धोक्‍यानुसार नुकसानभरपाई देय रक्कम राहील. पेरूसाठी प्रतिहेक्‍टर ५० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून, हप्ता २५०० रुपये आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०१७ आहे.

विभागात २४ तालुक्‍यांत योजना
यंदा विभागातील २४ तालुक्‍यांतील १५४ मंडलांत ही योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत कर्ज मंजूर असेल अशा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची, तर बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. डाळिंब फळपीक विमा संरक्षण योजनेसाठी धुळे जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स व जळगाव जिल्ह्यात डाळिंब, चिक्कू, मोसंबी व पेरू या फळपिकांसाठी एचडीएफसी इगो जनरल इन्शुरन्स ही कंपनी आहे. चिक्कू या फळासाठी विमा संरक्षित रक्कम ५० हजारांपर्यंत, विमा हप्ता २५०० रुपये, मोसंबीसाठी ७० हजार रुपये असून, त्यासाठी विमा हप्ता ३५०० रुपये भरण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बॅंकेशी, तसेच कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी केले.

Web Title: nashik news insurance plans for pomegranate