नाशिक बार असोसिएशनला  आयएसओ मानांकन प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक - देशातील पहिले ‘आयएसओ ९००१-२०१५ मानांकन’ मिळविणारा नाशिक बार असोसिएशन वकील संघ पहिलाच ठरला असून, वकिलांनी हे मानांकन टिकविण्यासाठी व वकील संघाचा गौरव वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी केले. त्यांच्या हस्ते नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांना विशेष समारंभात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

वकील संघाच्या सभासदांना ओळखपत्रांचे वाटपही न्यायाधीश ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या मानांकनामुळे वकिलांची जबाबदारी वाढली असून, हिशेबात पारदर्शीपणा ठेवावा लागणार आहे, असे अध्यक्ष ॲड. ठाकरे यांनी सांगितले. यापुढे वकील संघाने विविध क्षेत्रांत व वकिली व्यवसायाच्या नावलौकिकासाठी भरीव कार्य करावे, अशी अपेक्षा न्यायाधीश ढवळे यांनी व्यक्त केली. ॲड. जालिंदर ताडगे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. संजय गिते यांनी आभार मानले. ॲड. बाळासाहेब आडके, ॲड. सुरेश निफाडे, ॲड. हेमंत गायकवाड, ॲड. एम. टी. क्‍यू. सय्यद, ॲड. एस. यू. सय्यद, ॲड. किरण असोले यांच्यासह वकील उपस्थित होते.

Web Title: nashik news ISO rating nashik bar association