नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन

राजेंद्र बच्छाव
शनिवार, 8 जुलै 2017

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी (वय 35) यांचे आज (शनिवार) सकाळी सात वाजता सायकलिंग करताना सकाळी हॉटेल एक्‍सप्रेस इनजवळ हृदय विकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले.

नाशिक - नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी (वय 35) यांचे आज (शनिवार) सकाळी सात वाजता सायकलिंग करताना सकाळी हॉटेल एक्‍सप्रेस इनजवळ हृदय विकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले.

आपल्या 20 सहकाऱ्यांसह बिरदी नेहमीप्रमाणे 200 किलोमीटर सायकलिंगच्या राइडला जात होते. यावेळी हॉटेल एक्‍स्प्रेस इनजवळ ते अचानक खाली कोसळले. त्यांच्यासोबत असलेले मोहिंदरसिंग यांनी फाऊंडेशनचे सदस्य तुकाराम नवले यांना याबाबत कळविले. त्यानंतर नवले तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनी मिळून बिरदी यांना वक्रतुंड रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान रुग्णालयाजवळ पोहोचल्यावर गाडीतून खाली उतरताना बिरदी यांनी एक दीर्घ श्‍वास घेतला आणि ते शांत झाले, असे नवले यांनी सांगितले. डॉक्‍टरांनी बिरदी यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश मिळाले नाही. बिरदी यांच्या निधनाची वार्ता समजताच शेकडो सायकल प्रेमींनी रुग्णालय परिसराच गर्दी केली होती. बिरदी यांनी शुक्रवारीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सह्याद्रीच्या कुशीत शक्‍य असणाऱ्या 600 किलोमीटर सायकल ट्रॅकबाबत सकारात्मक चर्चा केली होती. पुढील आठवड्यातच या मार्गाच्या रेकीसाठी पूर्ण टीम जाणार होती.

बिरदी यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केल्याची माहिती नाशिकच्या गुरुगोविंदसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष कुलदीपसिंग बिरदी यांनी दिली. बिरदी यांच्यामागे एक मुलगी आणि एक मुलगी आहे.

Web Title: nashik news jaspalsingh birdi death news marathi news sakal news