ब्रिटिशकालीन ‘जावां’ची भरली शाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नाशिक - ब्रिटिश काळात सर्वच दुचाकी आयात होत असत. त्या वेळी जावा १५०, २५०, ३५०, ५०० सीसीओएचसी, ओगर, पेराक अन्य प्रकारच्या इंजिन असलेल्या बाइक भारतात उपलब्ध होत्या. दोन सायलेन्सर असलेल्या या बाइक मोठ्या ऐटीने रस्त्यावर धावताना दिसायच्या. कालांतराने आकर्षक व सुविधायुक्‍त दुचाकींनी या बाइकची जागा घेतली; पण एकेकाळी रस्त्यावरची शान असलेल्या जावा बाइकचे प्रदर्शन जागतिक जावा दिनानिमित्त भरविले गेले. कॉलेज रोडवरील श्रद्धा मॉल येथे भरविलेल्या या प्रदर्शनातून अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

नाशिक येझदी जावा क्‍लबच्या माध्यमातून दर वर्षी या दिनानिमित्त प्रदर्शन भरविण्यात येते. या वर्षी कॉलेज रोडवरील श्रद्धा मॉल येथे भरविलेल्या या प्रदर्शनात नाशिकसह पुणे, धुळे, बुलडाणा, सुरत, वापी, चंदीगड, दिल्ली येथील जावा बाइकप्रेमींनी वाहने सहभागी केली. प्रदर्शनातील ‘जावा वायसन’ या झोकोस्लोव्हकियामध्ये तयार झालेली बाइक प्रमुख आकर्षण ठरली. याशिवाय अन्य विविध मॉडेल नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्र ठरले.

बाराही महिने तरुणाईची वर्दळ असलेल्या कॉलेज रोड परिसरात भरविलेल्या या प्रदर्शनात अपेक्षेप्रमाणे युवावर्गाने गर्दी केली. युवकांनी विविध वाहनांसोबत सेल्फी टिपत या बाइकविषयीचे प्रेम व्यक्‍त केले. काहींनी सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल केले. महिला, लहान मुलांमध्येही या बाइकविषयी आकर्षण बघायला मिळाले.

Web Title: nashik news Java bike