शेतकऱ्यांवर दागिने गहाण टाकण्याची वेळ 

संतोष विंचू
शुक्रवार, 8 जून 2018

येवला - काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याने सातबारा कोरा झाला खरा; पण जिल्हा बॅंकेची झालेली आर्थिक कोंडी अन यामुळे रखडलेले खरीप पीककर्जाचे वाटप यामुळे त्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा बॅंकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. खरिपासाठी भांडवल उभे करण्यासाठी पावसाळा सुरू होताच घरातील सोन्याचे किडूक-मिडूक दागिने खासगी सहकारी बॅंका व पतसंस्थात गहाण (तारण) ठेऊन शेतकरी भांडवल तयार करत आहेत. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील सुमारे 25 हजार शेतकऱ्यांनी 600 ते 800 किलो सोने केवळ खरिपासाठी बॅंकांच्या हवाली केल्याचे चित्र आहे. 

शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक अडचणीत सापडल्याने खरिपाच्या कर्जवाटपाला पैसा राहिलेला नाही; तसेच राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकऱ्यांना उभ्या करत नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्जासाठी हक्काचा आधार राहिलेला नाही. सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांची ही होरपळ सुरू आहे. कर्जमाफीच्या गोंधळात जिल्हा बॅंकेची वसुली ठप्प झाली असल्यामुळे याचा परिणाम पीककर्जवाटपावर झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी हे चित्र असल्याने अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. मात्र, जिल्हा बॅंकेकडून पीककर्ज मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. तर राष्ट्रीयीकृत बॅंका बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना अन्‌ तेही तोंडे पाहून कर्जवाटप करतात. त्यातच हंगाम उभा करायचा तर म्हणजे लाखो रुपयांचे भांडवल शेतीला लागते. त्यासाठी पैसे कसे उपलब्ध करावेत या विवंचनेतील शेतकरी आता घरातील लक्ष्मीचे सोने तरणासाठी बॅंकाकडे ठेऊ लागले आहेत. 

डिसेंबरमध्ये सोडवले... मेमध्ये पुन्हा ठेवले 
मेपासूनच शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतो. त्यामुळे मागील महिन्यापासून बॅंका व पतसंस्थांत सोने तारणासाठी गर्दी वाढू लागली आहे. इतर कर्जापेक्षा या कर्जाचे व्याजदर कमी असल्याने शेतकरी घरात असलेले तसेच लक्ष्मीच्या अंगावरील दागिने जड अंतकरणाने बॅंकांच्या हवाली करत आहेत. खरिपाला पीककर्ज मिळण्याचा अनेकांचा अंदाज होता; मात्र तोही फोल ठरला असल्याने आता नव्या हंगामासाठी पुन्हा हेच सोने बॅंकेत ठेवण्याची नामुष्की ओढवली असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: nashik news Jewelry mortgage on time to farmers