काळाराम मंदिरात अतिरेकी हल्ल्याचा थरार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पंचवटी - ऐन दुपारी तीन अतिरेक्‍यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळाराम मंदिरात हल्ला चढवत भाविकांना ओलीस ठेवले. घटनेची माहिती कळताच पोलिस दलातील विशेष कमांडोंनी काळाराम मंदिराला घेराव घालत अतिरेक्‍यांच्या तावडीत सापडलेल्या भाविकांची सुखरूप सुटका करत तिघांना कंठस्थान घातले. थोड्या वेळाने हा हल्ला खराखुरा नसून पोलिसांच्या सरावाचा एक भाग असल्याचे समजल्यानंतर उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. परंतु तोपर्यंत या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

दुपारी बाराच्या सुमारास पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात तीन अतिरेकी शिरले असून, त्यांनी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना बंदुकीचा धाक दाखवत ओलीस ठेवल्याचा दूरध्वनी पंचवटी पोलिस ठाण्यात खणखणतो. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पन्नासच्यावर कमांडो, बाँबशोधक पथक, शीघ्र कृती दल सहभागी झाले होते. 

या वेळी कमांडो व तिन्ही अतिरेकी यांच्यात जोरदार चकमक उडाली. मंदिरात शिरलेल्या दोघा अतिरेक्‍यांचा मंदिराच्या पायऱ्यालगत खातमा करण्यात आला. तर तिसरा अतिरेकी पूर्व दरवाजाजवळ झालेल्या कारवाईत मारला गेला. अशा प्रकारे कमांडो पथकाने बाँब निकामी करीत तासाभराच्या कारवाईत तिन्ही अतिरेक्‍यांना कंठस्थान घातले.

काळाराम मंदिर हे शहरातील मुख्य मंदिरापैकी एक असून, येथे देशभरातील भाविकांची वर्षभर वर्दळ असते. त्यामुळे येथे अतिरेकी कारवायांची शक्‍यता लक्षात घेऊन मॉकड्रिल घेण्यात आल्याचे पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बर्डेकर यांनी सांगितले.

Web Title: nashik news kalaram mmock drill