सुटीचे औचित्य साधत कालिकादेवीच्या दर्शनास रीघ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नाशिक - शनिवारची सुटी व तिसऱ्या माळेचे औचित्य साधत आज कालिकामातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार जयवंत जाधव यांच्या हस्ते आज ग्रामदेवतेची आरती करण्यात आली. 

मंदिरात आज सकाळी श्रीदेवीसूक्त पठण करण्यात आले. महिला भजनी मंडळानेही सेवा अर्पण केली. औद्योगिक वसाहतीत शनिवारमुळे सुटी असल्याने गेल्या दोन दिवसांपेक्षा आज भाविकांनी अधिक गर्दी केली होती. 

सांडव्यावरच्या देवी दर्शनाला गर्दी
सांडव्यावरच्या सप्तशृंगीदेवी मंदिरातही भाविकांची गर्दी उसळत आहे. मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, सजावटही केली आहे. मंदिर परिसरात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने भाविकांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे जागा मिळेल तेथे गाड्या उभ्या केल्या जातात. हा रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडीही होत आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही येथे पाचव्या माळेला गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. देवस्थानतर्फे खास व्यवस्था केली आहे.

बच्चेकंपनीची खेळणीला पसंती
कालिकादेवी यात्रोत्सवानिमित्त खाद्यपदार्थांसह मोठ्या प्रमाणावर खेळणीवालेही दाखल झाल्याने खऱ्या अर्थाने यात्रोत्सवाची रंगत वाढत आहे. या वर्षी प्रथमच पोलिस व महापालिकेने ठोस भूमिका घेतल्याने जाण्या-येण्याचा रस्ता मोकळा मिळत आहे. यंदा प्रथमच लिलाव महागल्याने पाळण्यासह अनेकांनी दरातही वाढ केली आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे पोलिस यंत्रणेचे काम अधिक सोपे झाले आहे.

Web Title: nashik news kalika devi