महागडे रॉकेल किंवा पाच किलोचे सिलिंडर विका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - बीपीएल शिधापत्रिकाधारकांचा अपवाद वगळता इतर सगळ्यांचा शिधा बंद केल्याने रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांसाठी पुरवठा विभागाने खुल्या बाजारातील रॉकेल आणि गॅस सिलिंडर विक्रीचा पर्याय पुढे केला आहे. पुरवठा विभागाच्या डिझेल व घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असलेल्या या "सरकारी पर्याया'ला तालुक्‍यातील दुकानदारांनी आज झालेल्या बैठकीत विविध प्रश्‍न उपस्थित करीत प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले. 

नाशिक - बीपीएल शिधापत्रिकाधारकांचा अपवाद वगळता इतर सगळ्यांचा शिधा बंद केल्याने रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांसाठी पुरवठा विभागाने खुल्या बाजारातील रॉकेल आणि गॅस सिलिंडर विक्रीचा पर्याय पुढे केला आहे. पुरवठा विभागाच्या डिझेल व घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असलेल्या या "सरकारी पर्याया'ला तालुक्‍यातील दुकानदारांनी आज झालेल्या बैठकीत विविध प्रश्‍न उपस्थित करीत प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले. 

शासनाने बीपीएल शिधापत्रिका धारकांसाठीच्या अंत्योदय योजनेशिवाय इतर सगळ्या शिधापत्रिकांवरील धान्य पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील नव्वद टक्‍क्‍यांवर रेशन दुकानदारांचा रॉकेल आणि सरकारी धान्याचा कोटा देण्याचा प्रश्‍नच निकाली निघणार आहे. पण त्याचवेळी उर्वरित प्रत्येक दुकानातील दोन-पाच टक्के दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना "पॉइंट ऑफ सेल' मशिनद्वारे धान्य देण्यासाठी रेशन दुकानदारांची व्यवस्था मात्र शासनाला लागणार आहे. ही सगळी व्यवस्था टिकविण्यासाठी शासनाने रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांसाठी जोडधंदा म्हणून खुल्या बाजारातील रॉकेल आणि सिलिंडर विक्रीचे पर्याय देण्यास सुरवात केली आहे. 

नाशिक तालुक्‍यातील रेशन दुकानदारांची आज जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात रेशन दुकानदार रॉकेल विक्रेत्यांतर्फे संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे, मारुती बनसोडे, दिलीप नवले, कुंदन पुरोहित, स्वप्नील जैन, आर. बी. पारधी, आशा माहेश्‍वरी आदींनी त्यांच्या अडचणी मांडल्या. बैठकीत जीएसटीसह रॉकेल 62 रुपये लिटरप्रमाणे दुकानदारांना पडणार आहे. त्यावर नफा घेऊन दुकानदारांनी ते विकावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. याला विक्रेत्यांनी हरकत घेतली. सध्याच जर लोक रॉकेलऐवजी स्टोव्हमध्ये सरसकट डिझेल वापरतात, हे महागडे रॉकेल घेणार कोण, हा प्रश्‍न मांडला. त्यानंतर  पाच किलो गॅस सिलिंडर विक्रीचा पर्याय शासनाने मांडला आहे. त्यातही तोच घोळ आहे. सध्या 14.5 किलोचे सिलिंडर 700 रुपयांना मिळते. रेशन दुकानदारांनी पाच किलोचे सिलिंडर 350 रुपयांना विकावे, ही शासनाची अपेक्षा आहे. साधारण दीडपट जादा भावाचे खुल्या बाजारातील सिलिंडर ग्रामीण भागातील लोक घेतील कसे? ही व्यथा मांडली. 

तालुक्‍यातील स्थिती 
एकूण शिधापत्रिका ः 58,764 
आधार नोंदणी झाली ः 41,000 
आधार नोंदणी बाकी ः 17,000 

रॉकेल डिझेलहून महाग 
सध्याच कामकाजासाठी लोक रॉकेलऐवजी डिझेलचा सरसकट वापर करतात, जे सर्वश्रूत आहे. आता शासन रॉकेल विक्रेत्यांना डिझेलहून महाग म्हणजे 62 रुपये दराने खुल्या बाजारातील रॉकेल विक्रीचा आग्रह धरते आहे. पण ते महागडे रॉकेल घेणारे तर हवेत ना? 15 किलोचे सिलिंडर 700 रुपयांना मिळत असताना, पाच किलोचे सिलिंडर 350 रुपयांना ग्रामीण भागातील ग्राहक घेतील कसे? 
- निवृत्ती कापसे,  अध्यक्ष- रेशन दुकानदार संघटना 

Web Title: nashik news kerosene cylinder