राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिकेकडून शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

खंडू मोरे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

खामखेडा (नाशिक): शाळा व विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या योगदानामुळे राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, त्यामुळे त्या शाळेला पुरस्कार प्राप्त शिक्षिकेने पंचवीस हजार रुपयाचे संगीत व खेळाचे साहित्य देत शाळा व विद्यार्थीप्रत आपली बांधिलकी या योगदानातून दाखवून दिली. राज्य शिक्षक पुरस्कार्थी शिक्षिकेचा गावाने नुकताच सत्कार केला. त्या प्रसंगी साहित्याचे वितरण शाळेकडे करण्यात आले.

वाखारी (ता. देवळा) येथील प्राथमिक शिक्षिका रोहिणी बागूल यांना नुकताच राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. या सन्मानाबद्दल गावाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या व ग्रामस्थांनी शिक्षिकेचा सन्मान घडवून आणला. जि. प. सदस्या नुतन आहेर, पंचायत समिती सदस्य शांताबाई पवार यांच्या हस्ते नुकताच गावाच्या वतीने ह्या शिक्षिकेचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारामुळे गावाच्या लौकिकात भर पडल्याचे उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ यांनी यावेळी सांगितले. वाखारी शाळा सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. शैक्षणिक गुणवत्ता विकासात देखील शाळा अव्वल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे गावाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ जगदाळे यांनी सांगितले.

शाळेमुळे व गावामुळे आपल्या कामाचे कौतुक झाल्याने रोहिणी बागूल या शिक्षिकेने शाळेला पंचवीस हजार रुपये किमतीचे कॅसिओ, ट्रीपलकांगो, म, थापढोल, ताशा, ट्रॅंगल झांज, खंजिरी घुंघरू पॅड संगीत व रॅकेट्स, शटलबॉक्स पाच सेट, बुद्धिबळ सेट, रबर रिंगा, बॉल, दोरउडी खेळाचे साहित्य व कॉडलेस माईक संच शाळेला देत विद्यार्थी व शाळा प्रती बांधिलकीची साक्ष दिली. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकरे, विलास पवार, रमण खरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजया फलके, मुख्याध्यापक सुधाकर सोनवणे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक काशीनाथ सोनवणे तुळशीराम सोमवंशी, विलास बागुल, सुनिता निकम, चंद्रभागा बोरसे, अर्चना आहेर, वृषाली देसले, अर्चना काकडे आदींनी प्रयत्न केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nashik news khamkheda school teacher gift educational material