किसान शिखर मंच सुकाणू समितीतून बाहेर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

नाशिक - सुकाणू समितीमधील कामगार पुढाऱ्यांनी महागाईविरोधी आंदोलन करत स्वस्ताईचा आग्रह धरला. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्‍न माहिती नसल्याने समितीशी काडीमोड करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या किसान शिखर मंचच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, दिवंगत शरद जोशी यांच्या विचारधारेवर शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याचेही या वेळी ठरले. 

किसान शिखर मंचची दुसरी बैठक आज येथे झाली. बैठकीनंतर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, की शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 15 आणि 16 जुलैला नागपूरमध्ये होत आहे. या बैठकीनंतर विभागवार मेळावे होतील, राज्यस्तरावरील मेळावा होईल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील आंदोलनाची घोषणा केली जाईल. 

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयापासून 70 टक्के शेतकरी दूर राहिले आहेत. सरकार एकीकडे दुप्पट उत्पादनाची भाषा बोलत असले, तरीही त्यामागील शास्त्र स्पष्ट नाही. केंद्राचा बाजारपेठीय हस्तक्षेप थांबायला तयार नाही. म्हणूनच सरकारला शेतीतील कळते की नाही, असा प्रश्‍न पुढे आला असून, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आंदोलन केले जाईल, असे धोंडगे यांनी सांगितले.

Web Title: nashik news kisan shikhar manch sukanu committee