नायलॉन मांजा विक्रेत्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

जुने नाशिक - नायलॉन मांजा विक्रीला बंदी असूनही त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीस भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दुचाकीसह नायलॉन मांजाचे तीन गट्टू असा सुमारे ५२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोलिस उपनिरीक्षक अनमोल केदार, कर्मचारी दिनकर लंवाड, रियाज शेख, राजेश महाले, जावेद पठाण, श्री. शिंदे यांनी चौक मंडई येथे दाखल होत मांजा विक्रीची खात्री केली. संशयित एराफ अस्लम कोकणी (वय २२, रा. कोकणीपुरा) व अन्य दोन संशयितांसह त्यांच्याकडील दुचाकी (एमएच १५ एफजे ९८०९) च्या डिकीत नायलॉन मांजा ठेवून चोरीछुपी विक्री करताना दिसून आले.

जुने नाशिक - नायलॉन मांजा विक्रीला बंदी असूनही त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीस भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दुचाकीसह नायलॉन मांजाचे तीन गट्टू असा सुमारे ५२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोलिस उपनिरीक्षक अनमोल केदार, कर्मचारी दिनकर लंवाड, रियाज शेख, राजेश महाले, जावेद पठाण, श्री. शिंदे यांनी चौक मंडई येथे दाखल होत मांजा विक्रीची खात्री केली. संशयित एराफ अस्लम कोकणी (वय २२, रा. कोकणीपुरा) व अन्य दोन संशयितांसह त्यांच्याकडील दुचाकी (एमएच १५ एफजे ९८०९) च्या डिकीत नायलॉन मांजा ठेवून चोरीछुपी विक्री करताना दिसून आले. पोलिसांनी छापा टाकत संशयित एराफ यांच्यासह दोन हजार ७०० रुपयांचा नायलॉन मांजा, ५० हजारांची दुचाकी असा सुमारे ५२ हजार ७०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. अन्य दोघां संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळ काढला.

Web Title: nashik news kite crime

टॅग्स