पतंग, मांजा खरेदीकडे ग्राहकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नाशिक - पतंगांचा उत्सव म्हणून मानली जाणारी मकरसंक्रांत अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अजून ग्राहक दुकानांकडे वळले नाहीत.

पाठ फिरविल्याचेच चित्र दिसत आहे. मोबाईल व लॅपटॉपमुळे मुले कोणत्याही खेळासाठी बाहेरच पडत नसल्याने या वर्षी त्याचा फटका बसणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले. नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी असली तरी ठिकठिकाणी याची चोरी चोरी चुपके चुपके विक्री होत असल्याची चर्चा आहे. 

नायलॉन मांजा हवा असल्यास ‘गट्टू आहे का’ अशी विचारणा दुकानदारांकडे होत आहे. कारवाईच्या भीतीने अनेकांनी नायलॉन मांजा विक्री करत नसल्याचे फलक दुकानांवर लावले असल्याचे चित्र आहे. नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनीदेखील हा मांजा विक्रीची धास्ती घेतल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. असे असले तरी काही ठिकाणी मात्र लपूनछपून ही विक्री होत असल्याचीही चर्चा आहे. नायलॉन मांजा जर खरेदी करायचा असेल तर मुले ‘गट्टू आहे का,’ अशी विचारणा दुकानदाराकडे करतात. विशेष म्हणजे हे विचारतानाही त्यांचा चेहरा हा कावराबावराच झालेला दिसतो. भीतभीतच मांजाबद्दल विचारणा केली जाते.

विविध पोलिस ठाण्यांमध्ये नायलॉन मांजाविषयी तक्रारीही दाखल झाल्या आहेत. मकरसंक्रांतीला अजून चार दिवस बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नायलॉन मांजा विक्री रोखण्याचेही आव्हान असणार आहे. सुरती, बरेली, अहमदाबादी, पांडा असा विविध प्रकारचा मांजा विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

जीएसटीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मांजा तसेच पतंग यामध्ये २० ते २५ टक्‍क्‍यांनी भाववाढ झाली आहे. या वर्षी भाववाढ तर झालीच आहे पण विक्रेत्यांची संख्याही खूप वाढली आहे. त्यामुळे ग्राहक मिळविणे व स्पर्धेत टिकून राहणे यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. 
- सोमनाथ राधेश्‍याम पुरोहित, विक्रेता

Web Title: nashik news kite manja purchasing decrease