सप्तश्रृंगी देवी गडावरील घाट रस्त्यावर कोसळली दरड

दिगंबर पाटोळे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नांदुरी - सप्तश्रृंगी गड घाटात पावसाळ्यात नेहमी दरड कोसळत असते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वेळोवेळी आवश्यक यंत्रणेसह आपत्ती निवारन पथक तैनात करण्याची मागणी केली आहे. मात्र संबधीत खात्याकडून दुर्लक्ष होत असून मोठी दुर्घटना घडण्याची संबधीत विभाग वाट बघत असल्याचे वाटते. 
- संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते. सप्तश्रृंगी गड

वणी (नाशिक) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेशक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवी गडावरील (वणी गड) घाट रस्त्यावर आज सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान दरड कोसळली. त्याच दरम्यान पुणे येथील भाविकांच्या कारवरही दरडीचा काही भाग पडला. मात्र सुदैवाने यात गाडीमधील दोघे भाविक बचावले आहे. 

सप्तश्रृंगी गडावर दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर आज रात्री पासून पुन्हा पावसास सुरुवात झाली आहे. सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान नादुंरी - सप्तश्रृंगी गड या दहा किमी घाट रस्त्यावरील गणेश टप्पा परीसरातील घाटात डोंगराच्या कड्यावरील दरडीचा काही भाग कोसळला याच सुमारास पूणे येथील भाविकांची कार या भागातून जात होती. त्यात दरडीचा काही भाग कोसळला मात्र गाडीमध्ये असलेले पती-पत्नी असलेले भाविक सुदैवाने बचावले. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीवर कमी आकाराचे दरड पडल्यानंतर गाडी दहा बारा फुट पुढे जाताच मोठा दरड रस्त्यावर कोसळला. नशिब बलवत्तर व देवीची कृपा म्हणून गाडीतील भाविक थोडक्यात बचावले आहे.

घटनेची माहिती मिळताच सप्तश्रृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी राहुल बेनके, तनय जहागीरदार, सोमनाथ कडवे, समाधान अहिरे, हेमंत कानडे, दत्तु कुवर, राजु अहिरे आदी ग्रामस्थांसह घटना स्थळावर धाव घेतलपोलिस ठाणे, सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टला घटनेची माहिती देत. दरड पडलेल्या भाविकांना सुरक्षीत ठिकाणी हलवित. रस्त्यावरील दरड हटविण्यास सुरुवात केली. यावेळी न्यासाचे कर्मचारी,  नांदुरी - सप्तश्रृंगीगड टॅक्सी चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते, सप्तश्रृंगी गड व नांदुरी येथील ग्रामस्थ व पोलिसही घटनास्थळी दाखल होत रस्त्यावरील पडलेले दरड हटविण्यासाठी मदत कार्य सुरु करुन एक तासात रस्त्यावरील पडलेले दरड हटवून रस्ता वाहातूकीसाठी खुला करुन दिला आहे. 

नांदुरी - सप्तश्रृंगी गड घाटात पावसाळ्यात नेहमी दरड कोसळत असते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वेळोवेळी आवश्यक यंत्रणेसह आपत्ती निवारन पथक तैनात करण्याची मागणी केली आहे. मात्र संबधीत खात्याकडून दुर्लक्ष होत असून मोठी दुर्घटना घडण्याची संबधीत विभाग वाट बघत असल्याचे वाटते. 
- संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते. सप्तश्रृंगी गड

Web Title: Nashik news landslide in saptashrungi gad