‘ईईएसएल’ कंपनीकडूनच एलईडी फिटिंग खरेदीचे बंधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नाशिक - राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एलईडी फिटिंग खरेदी करताना करार केलेल्या केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीकडूनच खरेदी करण्याचे बंधन घालण्यात आले. त्याचा पहिला फटका नाशिक महापालिकेला बसला आहे. 

महापालिकेने शहरात ८५ हजारांहून अधिक एलईडी फिटिंग बसविण्याचा निर्णय घेतला. महासभेत ठरावाला मान्यता देताना खासगी कंपनीकडून पर्याय निवडण्यात आला होता. आता शासनाच्या नव्या निर्णयामुळे मात्र महापालिकेला सरकारी कंपनीकडूनच खरेदी करावी लागणार आहे.

सहा वर्षांपूर्वी महापालिकेत एलईडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेराव्या वित्त आयोगाच्या ऊर्जाबचतीच्या निधीतून प्रारंभी एलईडी बसविण्याचा निर्णय झाला. त्यानंतर उपसूचनेद्वारे शहरातील सर्वच फिटिंग बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ६५ कोटी रुपयांचा एलईडी दिवे बसविण्याचा ठेका तब्बल २२० कोटी रुपयांपर्यंत पोचला होता. ज्या कंपनीला काम देण्यात आले, ती हैदराबादस्थित एमआयसी कंपनी प्रारंभापासून वादात राहिली. २०१२ मध्ये शिवसेनेची सत्ता गेली. त्यानंतर मनसेची सत्ता आली. मनसेच्या सत्ताकाळात एलईडी प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर त्याविरोधात कोमल मेहेरोलिया, सुधाकर बडगुजर व संजय चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ठेकेदाराच्या बाजूने निकाल दिला. ठेकेदार कंपनीकडून शहरात साडेतीन हजार फिटिंग पुरविण्यात आल्या. त्यातील सुमारे पाचशे फिटिंग लावल्या पण त्याचा प्रकाश पडत नसल्याने महापालिकेने ठेकेदाराविरोधात जिल्हा न्यायालयात दावा ठोकला. अद्यापही महापालिकेत याबाबत दावा सुरू आहे. 

सोडियम बदलून एलईडी फिटिंगचा निर्णय
शहरातील ८५ हजार सोडियम फिटिंग बदलून त्याऐवजी एलईडी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. महासभेने ठराव पारित करून आठ दिवस उलटत नाहीत तोच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मागणी वाढली, शिवाय खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याची प्रकरणे समोर येत असल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीबरोबरच करार केला आहे. त्यामुळे यापुढे खासगी कंपन्यांतर्फे एलईडी बसविण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.

Web Title: nashik news LED ESEL Company Agreement LED fittings