वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यांवर ‘संक्रांत’

वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यांवर ‘संक्रांत’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नाशिक - ‘तीळगूळ घ्या अन्‌ गोड-गोड बोला’, असे म्हणत पतंगोत्सवाचा आनंद रविवारी (ता. १४) सर्वत्र लुटला जात होता. त्याचवेळी शहर आणि जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यावर ‘संक्रांत’ कोसळली. नायलॉन मांजाने दुर्मिळ जातीचे घुबड, तर वाहनाच्या धडकेत कोल्हा मृत्युमुखी पडला. त्याचवेळी बिबट्याने मेंढपाळाच्या कळपातून मेंढरू नेऊन त्याचा फडशा पाडला.

नायलॉन मांजामुळे घुबड दगावल्याची घटना सातपूर कॉलनीत घडली. नायलॉन मांजामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले घुबडाचे छायाचित्र सोशल मीडियातून ‘व्हायरल’ झाले होते. पक्षीप्रेमींनी याबाबत वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच नांदूरमध्यमेश्‍वर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाला. 

कोल्हा रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडल्याने संक्रांतीच्या सुटीमुळे पक्षी अभयारण्याकडे जाणाऱ्यांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.

पिंजरा लावण्याची मागणी
गिरणारे- वाडगाव रस्त्यावर रविवारी सकाळी मेंढपाळ मेंढ्या चारत होते. त्या वेळी कळपात शिरलेल्या बिबट्याने मेंढरू उचलून नेले. मेंढपाळांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. बिबट्याच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: nashik news leopard markar sankrant