‘संदर्भसेवा’मध्ये लेव्हल थ्री युनिटसाठी प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

विभागीय आयुक्तांकडून आढावा - मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक

नाशिक - जिल्हा रुग्णालयात बालमृत्युदरात वाढ झाल्याने खडबडून जागे झालेले राज्य शासन आता पायाभूत सुविधा उभारण्यासह एकूणच धोरण बदलण्याच्या तयारीत आहे. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि संदर्भसेवा रुग्णालयात ‘लेव्हल थ्री’चे स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिटबाबतचा (एसएनसीयू) प्रस्ताव उद्या (ता. ११) मुख्यमंत्र्यांकडे होत असलेल्या बैठकीत मांडला जाण्याची शक्‍यता व्यक्त केली.

विभागीय आयुक्तांकडून आढावा - मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक

नाशिक - जिल्हा रुग्णालयात बालमृत्युदरात वाढ झाल्याने खडबडून जागे झालेले राज्य शासन आता पायाभूत सुविधा उभारण्यासह एकूणच धोरण बदलण्याच्या तयारीत आहे. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि संदर्भसेवा रुग्णालयात ‘लेव्हल थ्री’चे स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिटबाबतचा (एसएनसीयू) प्रस्ताव उद्या (ता. ११) मुख्यमंत्र्यांकडे होत असलेल्या बैठकीत मांडला जाण्याची शक्‍यता व्यक्त केली.

दरम्यान, रुग्णालयाच्या एसएनसीयू कक्षात ६२ बालके दाखल असून, त्यांपैकी २१ बालके एक किलोपेक्षाही वजनाने कमी आहेत. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग द्वितीय श्रेणीत मोडतो. नवजात बालकांच्या एसएनसीयू कक्षात व्हेन्टिलेटरची सुविधा नाही. जिल्हा रुग्णालयात कमी वजनाची व प्रसूतिपूर्व जन्मलेली बालके दाखल होण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याने याठिकाणी ‘लेव्हल थ्री’चा एसएनसीयू कक्ष असावा का, याबाबत आज विभागीय आयुक्त झगडे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेटीप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी चर्चा केली. जिल्हा रुग्णालयात हा कक्ष उभारणे शक्‍य नाही. महापालिकेला यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने लेव्हल थ्रीची परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे आजमितीस हा कक्ष संदर्भसेवा रुग्णालयात उभारणे शक्‍य आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे उद्या (ता. ११) होत असलेल्या नियमित बैठकीत विभागीय आयुक्‍तांकडून मांडला जाण्याची शक्‍यता आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू कक्षाची पाहणी करून त्या संदर्भात सविस्तर आढावा घेत जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

लेव्हल थ्री म्हणजे काय?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत न्युओमेटॉलॉजिस्ट विभाग असल्याने त्याठिकाणी लेव्हल थ्रीच्या नवजात बालकांचा अतिदक्षता विभागाला मान्यता दिली जाते. कमी वजनाच्या बालकांसाठी इन्क्‍युबेटरसह व्हेन्टिलेटरची व्यवस्था असते. तसेच त्यासाठी न्युओमेटॉलॉजिस्टसह तज्ज्ञ कर्मचारी असावे लागतात. नाशिक जिल्ह्यात अशा कमी वजनी बालकांचा जन्मदर ५० टक्के असतानाही ‘मविप्र’चे वैद्यकीय महाविद्यालय व दोन खासगी रुग्णालयांत लेव्हल थ्रीची सुविधा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने महापालिकेच्या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता नाकारण्यात आली आहे. मात्र, संदर्भसेवा रुग्णालय हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्रेणीत असल्याने याठिकाणी न्युओमेटॉलॉजिस्ट विभाग कार्यान्वित करून काही महिन्यांत तो सुरू करणे शक्‍य आहे.

२१ बालके किलोच्या आतील  
जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू कक्षात उपचारासाठी ६२ बालके दाखल असून, त्यांपैकी २१ बालके एक किलो वजनापेक्षाही कमी आहेत. एक बालक अवघे ६५० ग्रॅमचे असून, त्यास कालच दाखल केले आहे.

Web Title: nashik news level 3 unit proposal in sandarbhseva