सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ‘लिदार’ सर्वेक्षणाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नाशिक - शहरे स्मार्ट करताना सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याचा भाग म्हणून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. नाशिकमध्ये कुठे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, याचे सर्वेक्षण आजपासून सुरू झाले. लिदार (लाइट डिटेक्‍शन ॲन्ड रेंजिंग) असे सर्वेक्षणाचे नाव असून, राज्याच्या महाआयटी कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेतर्फे सर्वेक्षण सुरू झाले आहे. महिनाभरात महाआयटी कंपनीला अहवाल सादर केला जाणार आहे. अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून शहरात तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. पोलिसांप्रमाणेच महापालिकेनेदेखील स्वमालकीचे प्रकल्प, मालमत्ता तसेच शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकादेखील तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष तयार केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे गरज असेल, तेथेच लावण्यासाठी शासनाच्या महाआयटी कंपनीने नियुक्त केलेल्या संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे. नागपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, परंतु त्यात तांत्रिक चुका आढळल्याने शासनाने निर्णय घेतला आहे.

असे होईल सर्वेक्षण
सर्वेक्षणाच्या लिदार तंत्रज्ञानात एका चारचाकी वाहनावर ३६० अंशात फिरेल असा कॅमेरा बसविला जाणार आहे. शहरात दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्या रस्त्यांवरून दहा किलोमीटर वेगाने ते वाहन फिरेल. कॅमेऱ्यांमध्ये ज्या भागातून वाहन फिरेल, त्या भागातील चित्रीकरण व रस्त्यांची मापे घेतली जाणार आहेत. एका महिन्यात सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षणासाठी लख्ख प्रकाशाची आवश्‍यकता असल्याचे सर्वेक्षक विद्याधर मिरजकर यांनी सांगितले.

Web Title: nashik news liday survey for CCTC Camera