बनावट मद्य वाहतुकीवर चेक नाक्‍यांची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नाशिक - नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या मधोमध असलेल्या दमण व दीवमधून मोठ्या प्रमाणात बनावट व स्वस्तातील मद्य नाशिक शहरात येण्याची शक्‍यता असल्याने सतर्क झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुजरात, दमण व महाराष्ट्राच्या सीमेवर पाच चेक नाके तयार केले आहेत.

औरंगाबाद, पेठरोड मार्गावरील ढाब्यांबर मद्य विकले जाण्याची शक्‍यता गृहीत धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे अध्यक्ष सी. बी. राजपूत यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यालगतच दीव व दमण हा केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश असल्याने येथे उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर करआकारणी कमी प्रमाणात होते. सर्वाधिक परिणाम करणारा घटक मद्य असून, येथून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये मद्य आणले जाते. यातून राज्य सरकारला आर्थिक झळ बसते. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात दमण भागातून नाशिकमध्ये बनावट मद्य येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाच ठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहेत.

ढाब्यांवर कारवाई करणार
नियमाप्रमाणे परमीट रूम असलेल्या जागेतच मद्यप्राशन करता येणार आहे. नाशिक शहराच्या काही भागांत अनधिकृतपणे ढाबे चालविले जात आहेत. त्यात मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून ढाब्यांवर नजर ठेवली जाणार आहे. दारू विकताना व पिताना आढळल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची कारवाई होणार आहे.

Web Title: nashik news Look at check on duplicate liquor transport