‘हवा येऊ द्या’ची हाक; जुने नाशिकमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नाशिक - मकरसंक्रांत म्हटले की पतंगांची लढत अन्‌ पतंग कापल्यावर ‘गयी बोले रे धिना..!’चा नारा, असे सामान्य चित्र बघायला मिळते. पण यंदा ढगाळ वातावरणामुळे पतंग उडविण्यासाठी अपेक्षित हवेत वेग नसल्याने ‘हवा येऊ द्या’चा आवाज तरुणाईने लावला. 

दुसरीकडे जुने नाशिक परिसरात मात्र पतंगोत्सवाचा आनंद अनुभवायला मिळाला. रंगीबेरंगी पतंगांनी व्यापलेले आकाश व तरुणाईला संगीताची साथ असे उत्साहवर्धक वातावरण जुने नाशिक परिसरात होते. सायंकाळपर्यंत संगीताच्या तालावर थिरकत पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद शहरवासीयांनी लुटला. मकरसंक्रांतीला तर गच्चीवर तरुणाईची मोठी गर्दी बघायला मिळते. या वर्षी मात्र वातावरणातील बदलाने युवकांच्या उत्साहावर पाणी फेरले. पतंग उडविण्यासाठी वातावरणात हवेचा वेग नसल्याने पतंग झेपावत नव्हता. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी लागणारी चुरस यावेळी बहुतांश परिसरात बघायला मिळाली नाही.

Web Title: nashik news makar sankrant kite

टॅग्स