पाडळदे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मालेगाव : पाडळदे (ता. मालेगाव) येथील कृष्णा नारायण कदम (वय 55) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून काल (ता. 5) रात्री विष प्राशन केले. अत्यवस्थ स्थितीत त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कदम यांच्या नावावर अवघी सव्वादोन एकर शेतजमीन असून, त्यातील बहुतांशी क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यांच्याकडे विकास संस्थेचे सुमारे 45 हजार रुपये; तर खासगी व हातउसनवारीचे दोन लाखांहून अधिक कर्ज असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान कसमादे, चांदवड, नांदगाव परिसरात शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्याप सुरूच असून, गेल्या सहा महिन्यांत 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा करूनही आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. पंधरा दिवसांपूर्वीच कळवाडी येथील अनिल देसले या तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Web Title: nashik news malegaon farmer suicide