नाशिक: मराठा विद्या प्रसारक निवडणुकीसाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

सेवकांच्या 3 जागांसह 21 जागांवर 52 उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदारांच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या आहेत.
सत्ताधारी प्रगती आणि विरोधकांच्या समाजविकास पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. सरचिटणीस पदाच्या उमेदवार आणि प्रगतीच्या नेत्या निलीमाताई वसंतराव पवार आणि विरोधकांच्या समाजविकास पॅनलचे नेते ऍड्‌. नितीन बाबूराव ठाकरे यांनी सकाळी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

नाशिक : बहुजन आणि मुलींच्या शिक्षणाची 104 वर्षांची परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी आठपासून मतदानाला सुरवात झाली. 14 मतदान केंद्रांवरील 48 बुथवर 10 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

सेवकांच्या 3 जागांसह 21 जागांवर 52 उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदारांच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या आहेत.
सत्ताधारी प्रगती आणि विरोधकांच्या समाजविकास पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. सरचिटणीस पदाच्या उमेदवार आणि प्रगतीच्या नेत्या निलीमाताई वसंतराव पवार आणि विरोधकांच्या समाजविकास पॅनलचे नेते ऍड्‌. नितीन बाबूराव ठाकरे यांनी सकाळी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. निफाडमध्ये 82 वर्षीय पार्वताबाई या ज्येष्ठ सभासदांनी मतदान केले.

नाशिकमधील मराठा हायस्कूल, अभिनव विद्यामंदिर, के. टी. एच. एम. महाविद्यालय या तीन ठिकाणासह सटाणा, निफाड, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा इथे मतदान सुरु आहे. सायंकाळी चारपर्यंत मतदान होईल. उद्या (ता. 14) सकाळी आठपासून नाशिकमधील के. टी. एच. एम. महाविद्यालय जिमखान्यात मतमोजणीला सुरवात होणार आहे. सायंकाळपर्यंत सर्व जागांचे निकाल अपेक्षित आहे. त्यानंतर होणाऱ्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निकाल जाहीर होईल.

Web Title: Nashik news Maratha Vidya Prasarak election