नाशिक जिल्ह्यात कंटेनर-ट्रकच्या अपघातात एक ठार

गोपाळ शिंदे
रविवार, 2 जुलै 2017

घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात आज सकाळी कंटेनर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक ठार झाला आहे.

घोटी (जि. नाशिक) - घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात आज सकाळी कंटेनर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक ठार झाला आहे.

घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास कंटेनर व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. सिन्नर येथील MH15 G 3993 साई रोडवेज ट्रान्सपोर्ट, मालवाहतूक करणारी ट्रक सिन्नरमार्गे मुबीकडे जात होती. यावेळी गुजरातमधून आलेला कंटेनर क्रमांक GJ29 U8289 सकाळी आठच्या दरम्यान समोरून येत होता. दोन्ही वाहने धामणगाव शिवारात आल्यानंतर त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कंटेनर चालक कैलास कुमार माली (वय 35) हा जागीच ठार झाला. तर अन्य काही जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक जनार्धन तेली, हवालदार सुहास गोसावी, संतोष दोंदे, प्रकाश कासार, लहू सानप, रमेश चव्हाण यांनी तातडीने चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येवून गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

Web Title: Nashik News Marathi news sakal news accident news sinner news