नाशिक: चांदवडला संत बाळू मामांच्या पालखीतील युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नाशिक जिल्ह्यातील खडकजांब (ता. चांदवड) येथे गेल्या काही दिवसांपासून आदमपूर येथील संत बाळू मामा यांच्या पालखीचा मुक्काम आहे.

चांदवड (जि. नाशिक) - नाशिक जिल्ह्यातील खडकजांब (ता. चांदवड) येथे गेल्या काही दिवसांपासून आदमपूर येथील संत बाळू मामा यांच्या पालखीचा मुक्काम आहे. या पालखीत सहभागी झालेल्या सेवेकरी युवकाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

चांदवड तालुक्‍यातील खडकजांब येथे गेल्या काही दिवसांपासून आदमपूर येथील संत बाळू मामा यांच्या पालखीचा मुक्काम आहे. या पालखीत बाळू मामांच्या सेवेसाठी उमेश भिला गरदरे (वय 18, रा. गंगापूर ता. साक्री) या युवकाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे. खडक ओझर परिसरात राहणारे शेतकरी निवृत्ती पगार यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने पगार यांच्या शेततळ्यात पडलेला उमेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Web Title: nashik news marathi news sakal news chandwad news warkari killed