नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत करण सिंगला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथून सकाळी सहापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. पूर्ण व अर्ध मॅरेथॉन सोबत विविध गटात धावण्याची स्पर्धा झाली. यात शाळकरी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय धवपटूंनी सहभाग नोंदवला.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत हरियाणाच्या करण सिंग याने विजेतेपद पटकावले. सोबतच त्याने वेळेचा विक्रम प्रस्थापित केला. या पूर्वी सर्धेत 2 तास 27.27 मिनिटांचा विक्रम मोडताना 2 तास 22.39 मिनिटे अशी वेळ त्याने नोंदविली. थंडीचा उचांक असतांना पाच हजारहुन अधिक धवपटूंनी सहभाग नोंदविला.

गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथून सकाळी सहापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. पूर्ण व अर्ध मॅरेथॉन सोबत विविध गटात धावण्याची स्पर्धा झाली. यात शाळकरी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय धवपटूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, मॅरेथॉन आयोजन समितीच्या अध्यक्षा व मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उप सभापती राघो नाना अहिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंनी सहभाग नोंदविला असल्याने स्पर्धेत चुरस बघायला मिळाली. पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेच्या निकालाकडे लक्ष लागून होते. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रचा धावपटू किशोर गव्हाणे राहिला. त्यानेदेखील गेल्या वर्षीच्या विक्रम मोडीत काढला. 2 तास 25.26 मिनिटे वेळ घेत त्याने स्पर्धा पूर्ण केली. तिसऱ्या स्थानी पुण्याचा अभिमन्यू कुमार होता.

Web Title: Nashik news Marathon in Nashik

टॅग्स