पैसा लागला मिळू, विवाह नोंदणी झाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पूर्व विभागाची स्थिती; आर्थिक वर्षाच्या चार महिन्यांत १८५ दांपत्यांकडून नोंद, जनजागृतीवर भर

जुने नाशिक - नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. याला विवाह सोहळेही अपवाद नव्हते. पैसेच मिळत नसल्याने अनेकांनी हे सोहळे पुढे ढकलले, रद्द केले. त्यानंतर चलन पुरेसे उपलब्ध झाल्याने विवाह सोहळेही थाटात झाले आणि त्याचबरोबर नोंदणीनेही वेग घेतला. यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले असताना आतापर्यंत १८५ दांपत्यांनी विवाह नोंदणी केली आहे. अजून आठ महिने बाकी असल्याने महापालिकेने जनजागृतीवर अधिक भर दिला आहे.  

शासकीय कार्यालयात आधारकार्ड, शिधापत्रिकेप्रमाणेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रही अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे नवविवाहितांसह पूर्वी विवाह झालेल्या दांपत्यांकडूनही नोंदणी करून घेतली जात आहे. ९० दिवसांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आल्याने नागरिकांकडून विवाह नोंदणी करण्यासाठी विभागीय कार्यालयांत गर्दी होत आहे. पूर्व विभागीय कार्यालयांमध्येही अशीच परिस्थिती आहे. येथील विवाह नोंदणीचा विचार केल्यास २०१६-१७ मध्ये संपूर्ण वर्षात ४३६ दांपत्यांकडून विवाह नोंदणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैपर्यंत १३६ विवाह नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा आजपर्यंत चार महिन्यांतच १८५ नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुस्लिम दांपत्यांच्या नोंदणीत अडचणी
पूर्वी मुस्लिम धर्मगुरू अथवा मौलवींकडून लावण्यात आलेल्या विवाह नोंदणीस मान्यता होती. त्यांच्याकडून देण्यात येणार निकाहनाम्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जात होते. त्यानंतर राज्य शासनाकडून शासकीय विवाह नोंदणी कार्यालयातच सर्वांना नोंदणी करण्यास अनिवार्य केले आहे. तेही शहर-ए-काजी यांची सही असलेला निकाहनामा असेल तरच त्या दांपत्यांची विभागीय विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केली जात आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना विवाह नोंदणीत अडचणी येत आहेत.

विवाह नोंदणी वाढण्याची कारणे
नोटाबंदीमुळे घट झालेले विवाह सोहळे यंदा तेजीत होते
शासनाकडून ९० दिवसांच्या आत विवाह नोंदणीची घालण्यात आलेली अट
शासकीय कार्यालय, शाळेत विवाह नोंदणी प्रमाणपत्राची होणारी मागणी
महापालिका पश्‍चिम विभागाचा पूर्व विभागास जोडण्यात आलेला नवीन भाग

Web Title: nashik news marriage registration start