वैद्यकीयसाठी आज अर्जाची अखेरची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नाशिक - वैद्यकीय शाखेच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यापूर्वी दहावी, बारावीची परीक्षा महाराष्ट्रातून दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कोट्यासाठी पात्र ठरविले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यात बदल केला असून, आता दहावी बाहेरच्या राज्यातून; पण बारावी महाराष्ट्रातून दिलेले विद्यार्थी या कोट्यासाठी पात्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्याची आज (ता. १०) अखेरची संधी आहे. 

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीएच, बी. एस्सी नर्सिंग यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे वेळापत्रक व आदेश जारी केले होते. या प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या महाविद्यालयांसह संलग्न महाविद्यालये, खासगी वैद्यकीय महाविद्यालये, अल्पसंख्याक महाविद्यालयातील जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. 

‘नीट’चा निकाल २६ जूनला जाहीर झाला होता. त्यानंतर लगेचच २८ जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाली होती. सध्या ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, उद्या (ता. १०) सायंकाळपर्यंत इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. प्रारूप गुणवत्तायादी बुधवारी (ता. १२) जाहीर होणार आहे. राज्यातील चार केंद्रांवर १४ जुलैपासून कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पडेल. सुधारित प्रारूप गुणवत्तायादी २४ जुलैला प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर ऑनलाइन स्वरूपात प्राधान्यक्रम भरण्यासाठी विद्यार्थ्यांना २४ ते २७ जुलैपर्यंत मुदत असेल. 

...पण अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ नाही
महाराष्ट्र कोट्यासंदर्भातील अटीत बदल करण्यात आला आहे. मात्र, या बदलानंतर या कोट्यासाठी अर्ज भरण्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे संचालनालयातर्फे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत आज (ता. १०) ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे.

Web Title: nashik news medical