जुन्याच ठेकेदाराला औषध खरेदी देण्याचा घाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नाशिक -  महापालिकेच्या रुग्णालयांत सुमारे तीन हजार प्रकारच्या सव्वा कोटी रुपयांची औषधखरेदी करण्यास आज मान्यता देण्यात आली. परंतु, त्यापूर्वी जुन्याच ठेकेदाराला औषध खरेदीचे कंत्राट देण्याचा प्रकार उघडकीस आला. ज्या औषध खरेदीला मान्यता दिली जाते, त्याव्यतिरिक्त अन्य कंपन्यांची औषधे रुग्णालयांत दिसत असल्याने औषधांची अदलाबदलीवरही चर्चा झाली.

महापालिका रुग्णालयांत आज पुन्हा सव्वा कोटी रुपयांच्या औषधे खरेदीला मान्यता देण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे खरेदी करण्यात आली होती. आजच्या औषध खरेदीच्या प्रस्तावाचे वैशिष्ट्य म्हणजे २०१६-१७ मध्ये खरेदीच्या विषयाला मंजुरी मिळाली, परंतु, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने विलंब झाल्याचे कारण देत सहा तुकड्यांमध्ये सव्वा कोटींच्या औषध खरेदीचे प्रस्ताव ठेवण्यात आले. तातडीची औषध खरेदी आयुक्तांच्या मान्यतेने घ्यावी व उर्वरित औषध खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिला.

तारांगण पुन्हा ठेकेदाराकडे
महापालिकेतर्फे चालविले जाणारे तारांगण पांढरा हत्ती ठरत असताना पुन्हा ठेकेदाराकडे चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १९ लाख ४० हजारांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. २००७ मध्ये तारांगण तयार करण्यात आले. तारांगणाच्या माध्यमातून महिन्याला पाच लाख रुपये उत्पन्न, तर त्यावर वार्षिक खर्च २२ लाख रुपये होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘पेस्ट कंट्रोलचा अहवाल द्या’
शहरात पेस्ट कंट्रोलचा ठेका घेतलेल्या दिग्विजय एन्टरप्राईजेस कंपनीला अल्टिमेटम देण्यात आला. धूर व औषध फवारणीसाठी सर्व साहित्य महापालिकेकडून पुरविले जाते तरीसुद्धा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ज्या प्रभागात धूर फवारणी होते, त्या भागातील नगरसेवकांना सूचित करणे बंधनकारक होत नसल्याचा मुद्दा नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी उपस्थित केला. एकूणच पेस्ट कंट्रोलबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन पुढील सभेत सविस्तर अहवाल ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title: nashik news medicine contractor