मिलिंद खैरनार यांना हवाई दलाची मानवंदना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नाशिक - जम्मू-काश्‍मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये वीरमरण आलेले भारतीय वायुदलाच्या गरुडा पथकातील कमांडो मिलिंद किशोर खैरनार (33) यांचे पार्थिक गरुवारी सकाळी दहा वाजता ओझर येथील हवाई दलाच्या विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर ओझरच्या हवाई दलाचे एअर कमांडिग ऑफिसर शरद जैन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर खैरनार यांचे पार्थिक बोराळे (जि. नंदुरबार) या त्यांच्या मूळगावी अंत्यविधीसाठी रवाना झाले. बंदीपुरा येथे बुधवारी (ता.11) दहशतवाद्याशी झालेल्या चकमकीमध्ये खैरनार यांना वीरमरण आले.

नाशिक - जम्मू-काश्‍मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये वीरमरण आलेले भारतीय वायुदलाच्या गरुडा पथकातील कमांडो मिलिंद किशोर खैरनार (33) यांचे पार्थिक गरुवारी सकाळी दहा वाजता ओझर येथील हवाई दलाच्या विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर ओझरच्या हवाई दलाचे एअर कमांडिग ऑफिसर शरद जैन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर खैरनार यांचे पार्थिक बोराळे (जि. नंदुरबार) या त्यांच्या मूळगावी अंत्यविधीसाठी रवाना झाले. बंदीपुरा येथे बुधवारी (ता.11) दहशतवाद्याशी झालेल्या चकमकीमध्ये खैरनार यांना वीरमरण आले. चंडीगड येथून हवाई दलाच्या विमानातून त्यांचे पार्थिव आज सकाळी ओझर विमानतळावर उतरले. या वेळी लष्करी इतमामानुसार त्यांना सलामी देण्यात आली. एअर कमांडिग ऑफिसर शरद जैन यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. 

नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, माजी आमदार दिलीप बनकर यांच्यासह उपस्थितांनी पुष्प अर्पण करून खैरनार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून खैरनार यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी बोराळे (जि. नंदूरबार) येथे रवाना झाले. याप्रसंगी खैरनार यांची पत्नी हर्षदा, मुलगी, मुलगा व नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: nashik news milind khairnar