मनसेच्या पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे गणेशोत्सवानंतर शहरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नाशिक - विधानसभा व महापालिका निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे येथे संघटना पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून एके काळी मनसेला सत्ता देणाऱ्या नाशिकमध्येदेखील संघटनात्मक पातळीवर पुनर्रचना केली जाणार आहे. संघटनात्मक बांधणीसाठी स्वतः राज ठाकरे गणेशोत्सवानंतर शहरात दाखल होणार आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर मरगळ आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजूनही उभारी घेता येत नाही. राज ठाकरेही निवडणुकीतील जाहीर सभेनंतर नाशिककडे फिरकले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईपासून त्यांनी नव्याने पक्षबांधणीची सुरवात केली आहे. 

पक्षबांधणीमध्ये शाखाप्रमुखांपासून बदल केले जाणार आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. पूर्व, मध्य व पश्‍चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहराध्यक्ष ॲड. राहुल ढिकले व महापालिकेतील मनसेचे गटनेते सलीम शेख यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठका सुरू आहेत.

Web Title: nashik news MNS Raj Thackeray