शहरात मोहोळ विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नाशिक - शहर परिसरात अनेक भागांत झाडावरून मोहोळ काढून त्यातील मध विक्री करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या घरोघरी फिरून मध विकतात. झाडावर किंवा इमारतीवर पोळे दिसले, की त्या घरमालकाला फिफ्टी- फिफ्टीचा सौदा करून पोळे काढून घेण्याचा प्रकार नाशिकमध्ये घडत आहे. या मधाला प्रचंड मागणी असल्याने व मधामध्ये औषधी गुणधर्म असल्याने ते या मधमाश्‍यांच्या जिवावर बेतत आहे. यामुळे मधमाश्‍यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

अमेरिकेतील कृषी विभागाने मधमाश्‍यांसंदर्भात दिलेल्या अहवालानुसार मधमाश्‍यांच्या संख्येत एकतृतीयांश एवढी घट झाली आहे. ही घट जैवविविधतेबरोबर आर्थिक नुकसानही करणार आहे. परागीकरणाचे काम फुकट करणाऱ्या या मधमाश्‍या शहरातील टॉवरमधील विद्युत चुंबकीय लहरी(एलेक्‍ट्रो मॅग्नेटिक वेब्ज)च्या शरीरात असलेल्या ‘चुंबकीय रडार’वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माश्‍या गोंधळून जातात. मधमाश्‍यांच्या पोळ्याजवळ मोबाईल ठेवला असता दहा दिवसांतच तेथे येणाऱ्या माशा बंद झाल्याची नोंद करण्यात आली. उन्हाळा व वाढलेली आर्द्रता यामुळेही मधमाश्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. एका मोहोळमध्ये तब्बल पस्तीस ते सत्तर हजार माश्‍या वास्तव्यास असतात. एका घरात एक राणी माशी, दोनशे ते तीनशे नर आणि हजारो कामकरी माश्‍या राहतात. या घरात राणीमाशी केवळ अंडी घालण्याचेच काम करीत असते. ती रोज तब्बल हजार अंडी घालते. वाढत्या शहरीकरणामुळे मधमाश्‍यांचे खाद्य म्हणजे फुलातील रस मिळेनासा झाला आहे.

सिमेंटच्या जंगलांचे शहर
शहरीकरणामुळे डेरेदार व महाराष्ट्रीयन वृक्ष शहरातून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे माशांना मोहोळासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही त्यामुळे उंच इमारतींचा आश्रय मधमाशा घेत आहेत

Web Title: nashik news mohol sailing gang