नाशिकहून लांब पल्ल्यासाठी ‘एसटी’तर्फे स्लिपर कोच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नाशिक - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त अकराशे वातानुकूलित बस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. नाशिकसाठी त्यातून मिळणाऱ्या काही बसचा वापर स्लिपर कोचसाठी केला जाणार आहे. नाशिकहून कोल्हापूर, पंढरपूर, शेगाव, पणजीला जाणाऱ्या प्रवासासाठी त्यांचा वापर होईल, असा प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती ‘एसटी’च्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. 

‘एसटी’च्या वर्धापन दिनानिमित्त आज श्रीमती जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘येत्या ऑगस्टपासून स्लिपर कोच सेवेत दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. त्यात कोल्हापूर, पंढरपूर, रत्नागिरी, पणजी, शेगाव, महाबळेश्‍वर, तुळजापूरला रात्री जाणाऱ्या बसचा समावेश आहे. साधारण बसच्या भाड्यापेक्षा केवळ दहा टक्‍के जादा भाडे देऊन प्रवाशांना आरामदायी प्रवासाचे सुख मिळणार आहे. सध्या महामंडळाने नाशिक जिल्ह्यात सर्वच बसस्थानके अद्ययावत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मालेगाव, सिन्नर, कळवण, सटाणा येथील बसस्थानके अद्ययावत झाली आहेत.’’ 

त्या म्हणाल्या, ‘‘नाशिकमधील महामार्ग बसस्थानकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मेळा बसस्थानकही अद्ययावत केले जाणार आहे. आदिवासी विकास विभागाचे ६० लाख रुपये खर्च करून दिंडोरी बसस्थानक अद्ययावत केले आहे. पेठलाही काम सुरू होणार आहे.’’

२६ कर्मचाऱ्यांना ‘कन्यादान’चा लाभ 
बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेचा आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात २६ कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१६ नंतर मुलगी झाली आहे. त्या मुलीच्या नावावर ही रक्‍कम जमा केली जात आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर ती रक्कम त्यांना काढता येईल. आज वर्धापन दिनानिमित्त ‘एसटी’ने प्रत्येक बसस्थानकावर कार्यक्रम घेतले. स्वच्छता मोहीम राबवली, अतिक्रमण काढले, असेही श्रीमती जोशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: nashik news msrtc st bus Slipper Coach

टॅग्स