भाजपच्या विनंतीपत्रामुळे ‘स्वीकृत’ची निवड अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक - स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याने नियुक्ती पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. भाजपकडून तीन नावे निश्‍चित झाली असताना पालकमंत्र्यांसह आमदारांकडून काही नावांना विरोध झाल्याने नियुक्‍त्या पुढे ढकलण्यासाठी आयुक्तांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांनी नकार दिला, तर आयुक्तांनी भाजपकडून नियुक्ती पुढे ढकलण्यासाठी विनंतीपत्र आल्याचे सांगितले.

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर एक महिन्यानंतर पहिली बैठक होईल, त्या वेळी महापौरांसह सभागृहनेते व गटनेत्यांची बैठक बोलावून स्वीकृत सदस्यत्वाचा निर्णय घ्यावा, असा नियम आहे. निवडणूक होऊन सात महिने उलटले, तरी स्वीकृत सदस्यत्वाची घोषणा झाली नाही. पहिल्यांदा २१ ऑगस्ट मुदत दिली होती. परंतु, भाजपसह शिवसेनेच्या गटनेत्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार १६ सप्टेंबर अखेरची मुदत देण्यात आली. दुपारी एकपर्यंत दोन्ही पक्षांकडून सदस्यांची नावे अतिरिक्त आयुक्तांकडे आली नाही. यासंदर्भात आयुक्त कृष्णा यांनी भाजपकडून मुदतवाढीची मागणी केल्याचे सांगितले. याबाबत विचार करून निर्णय घेणार असून, त्यासाठी कायदेशीर मत घेतले जाणार आहे.

भाजपमध्ये राजकारण
महापालिका निवडणुकीत माघार घेण्यासाठी अनेक नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर दाखविण्यात आले. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दीडशेच्या आसपास गेली. त्यातील ३८ नावांची यादी वरिष्ठांकडे पाठविल्याचे सांगण्यात आले असले तरी नाशिक रोड मंडलचे बाजीराव भागवत, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजिंक्‍य साने व भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रशांत जाधव यांची नावे निश्‍चित झाली आहेत. अजिंक्‍य साने यांच्या नावाला एका आमदाराने विरोध केल्याचे बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या एका उमेदवारासाठी आग्रह धरला गेल्याने अखेरपर्यंत नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणल्याचे समजते.

Web Title: nashik news municipal approved corporator selection