महापालिकेला पाण्यासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नाशिक - राज्य मंत्रिमंडळाने जलसंपदा विभागाच्या पाणी दरवाढीला मंजुरी दिल्याने त्याचा परिणाम महापालिकेला अतिरिक्त रक्कम मोजण्यावर होणार आहे. महापालिकेला गंगापूर धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यावर अतिरिक्त वार्षिक एक कोटी सहा लाख ३५ हजार, तर चेहेडी बंधाऱ्यातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यावर वार्षिक १३ लाख ८५ हजार रुपये मोजावे लागतील.

जलसंपदा विभागाने पाण्याचे नवे दर जाहीर केले. महापालिकेसाठी एक हजार लिटरचा यापूर्वीचा दर २१ पैसे होता, तो आता २५ पैसे करण्यात आला. गंगापूर धरणातून ९७.५० टक्के पाणी घरगुती वापरासाठी वापरले जाते, तर औद्योगिक वापरासाठी साडेतीन टक्के पाणी उचलले जाते. औद्योगिक दर यापूर्वी एक हजार लिटरला ४२ पैसे होता. त्यात पन्नास टक्के वाढ करण्यात आली. गंगापूर व दारणा धरणातून महापालिकेकडून पिण्यासाठी ४४० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यापोटी महापालिकेला वार्षिक तीन कोटी ६९ लाख ७०८ हजार रुपये अदा करावे लागतात. 

नवीन दरानुसार घरगुती वापरासाठी महापालिकेला एक कोटी आठ लाख १६ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. औद्योगिक वसाहतीसाठी उचलल्या जाणाऱ्या पाण्यावर वार्षिक ७२ लाख १० हजार ८०६ रुपये पाणीपट्टी द्यावी लागते. आता वार्षिक एक कोटी आठ लाख १६ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. महापालिका दारणा धरणातून पाणी उचलते, थेट नदीतून पाणी उचलले जात असल्याने त्याचे दर दुप्पट असून, ते ४२ पैसे प्रति हजार रुपये लिटर असे आहेत. त्या दरात पन्नास टक्के म्हणजेच ४७ पैसे वाढ होणार असल्याने दारणेचे पाणी महापालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

Web Title: nashik news municipal corporation water