भरीव तरतुदीमुळे विकास झेपावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक - महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजप बहुमताने सत्तेवर आला. भाजपच्या सत्ताकाळातसुद्धा अंदाजपत्रकाने वास्तवता बाजूला ठेवून कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. प्रशासनाने १४०१ कोटींचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समितीने त्यात ३८० कोटींनी वाढ केली, तर महासभेने त्यात आणखी नवीन योजनांचा समावेश करून तब्बल २१६७ कोटींच्या वर अंदाजपत्रक पोचवले आहे. 

आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास तीन महिने शिल्लक राहिले आहेत. शिल्लक निधीचा विचार करता प्रशासनाने सादर केलेल्या १४०१ कोटींच्या अंदाजपत्रकाचीच अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. महापालिकेने आतापर्यंत रस्तेविकास, स्मार्टसिटी योजना व अमृत योजनेतील आपला हिस्सा दिला आहे. नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाखांच्या विकास निधीतून कामे मार्गी लावली.

विकासकामांसाठी तरतूद
एप्रिल २०१७ प्रशासनाकडून १४०१ कोटींचे अंदाजपत्रक मे २०१७ स्थायी समितीकडून ३६० कोटींची वाढ
जून २०१७ मध्ये महासभेने २१६७ कोटींपर्यंत फुगविले
महसुलावर ८७५.७४ कोटींचा खर्च अपेक्षित
मुकणे धरणासाठी ६० कोटी रुपये
भूसंपादनासाठी ७० कोटी रुपये
स्मार्टसिटी योजनेत महापालिकेचा हिस्सा ५० कोटी
अमृत योजनेसाठी वीस, तर पंतप्रधान आवाससाठी दहा कोटी विकासकामांसाठी १३० कोटी रुपये शिल्लक
प्रत्येक नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी
नगरसेवक विकास निधीवर एकूण ९५ कोटींचा खर्च

Web Title: nashik news municipal development