स्वातंत्र्यदिनी महापालिकेचे ‘स्मार्टकार्ड’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नियमित करदात्यांना मिळणार मोफत, डिजिटल पेमेंटची सुविधा

नाशिक - महापालिकेने डिजिटल इंडियाकडे आणखी एक दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला स्मार्टकार्ड संकल्पना अमलात येणार आहे. या कार्डचा उपयोग नागरिकांना क्रेडिटकार्डप्रमाणे करता येणार आहे. अर्थात, ही सेवा येस बॅंकेतर्फे पुरवली जाईल. कार्डद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा आहे. महापालिकेचे कर अदा करण्याची सुविधा कार्डमध्ये आहे.

नो अवर वर्क्‍स, मातृत्व लाभ, महापालिकेच्या कामकाजाबाबत तक्रारींची सुविधा, रक्तपेढी, नगरसेवकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, फेसबुक, यूट्यूब, ऑनलाइन सर्व्हिस आदींसाठी महापालिकेने विविध प्रकारचे ॲप्लिकेशन तयार केले आहेत. आता पुढील टप्प्यात स्मार्टकार्ड योजना अमलात येणार आहे. १५ ऑगस्टला कार्डचे लाँचिंग होईल. नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना कार्डचे वाटप मोफत होईल. ानंतरच्या कार्डवर ठराविक रक्कम आकारली जाईल. हॉटेल, पार्किंग, महापालिकेचे विविध कर, मनोरंजनाच्या ठिकाणी या कार्डचा वापर करता येणार आहे. महापालिकेच्या सुविधा केंद्रांवर कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा राहील. ऑनलाइन वॉलेटच्या माध्यमातून कार्ड रिचार्ज करता येईल. या सेवेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटला चालना देऊन शहराची नवी ओळख निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा
महापालिकेने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे नागरिकांना घरबसल्या नोंदी करून सर्टिफिकेट मिळविता येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ऑनलाइन योजना ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल. विवाह नोंदणीवगळता जन्म-मृत्यू, अग्निशमन, बांधकाम परवाने आदी दाखले घरबसल्या मिळणार आहेत.

ऑगस्टमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’
जर्मन सरकारच्या सहकार्याने महापालिकेने पाथर्डी फाटा येथील कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. टप्पा क्रमांक १ व २ मधून वीजनिर्मिती सुरू होणार आहे. महापालिकेला मासिक ९९ हजार युनिट वीज प्रकल्पातून मिळणार आहे. १५ ऑगस्टला प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे.

Web Title: nashik news municipal smartcard at independent day